Sun, Aug 25, 2019 00:18होमपेज › Kolhapur › बी टेन्युअरनंतर भूविकास बँक इमारतीची विक्री

बी टेन्युअरनंतर भूविकास बँक इमारतीची विक्री

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:38AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात भूविकास बँकेच्या इमारतीवरील बीटेन्युअरचा शेरा काढूनच ही इमारत विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे व भूविकास बँक कर्मचार्‍यांच्या एकत्रित बैठकीस हा निर्णय घेण्यात आला. तसेच इमारत विक्रीची निविदा अंतिम झाल्यापासून एक महिन्याच्या आता जिल्हा उपनिबंधक कार्यालय रिकामे करण्याची ग्वाही काकडे यांनी दिली. या निर्णयामुळे बुधवारी (ता. 10) नव्याने काढण्यात येणारी ई-निविदा प्रक्रिया पुन्हा थांबवण्यात आली. भू-विकास बँकेची इमारत विक्री करून कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.

त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या इमारतीची विक्री करण्यासाठी दोनवेळा ई-निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, या इमारतीवर बीटेन्युअरचा शेरा असल्याने त्यास खरेदीदार मिळाला नाही. एलआयसीने ही इमारत खरेदी करण्याची तयारी दर्शवत असतानाच इमारतीवरील बीटेन्युअर काढण्याची व इमारत खाली करण्याची मागणी केली होती. मात्र, एलआयसीने जरी तयारी दर्शवली तरी प्रत्यक्षात निविदेत त्यांनी भागच घेतला नसल्याचेही मंगळवारी निविदा उघडल्यानंतर स्पष्ट झाले.  सोमवारी भूविकासच्या कर्मचार्‍यांनी विभागीय उपनिबंधकांची भेट घेतली. कायदेशीर अडचणी असताना इमारत विक्रीचा घाट का, असा सवाल भूविकासच्या कर्मचार्‍यांनी करत ही प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. यावेळी विभागीय उपनिबंधक रंजन लाखे, जिल्हा उपनिबंधक काकडे व अवसायक बल्लाळ उपस्थित होते. बैठकीत श्रीकांत कदम यांनी बी टेन्युअरची नोंद कमी करूनच ई-निविदा काढण्याची आग्रह केला. ही मागणी मान्य करण्यात आली.यावेळी बँकेचे व्यवस्थापक एन. वाय. पाटील, रावसाहेब चौगुले, नंदकुमार पाटील, भारत पाटील, चंद्रकांत आडके, एम. जी. शेख, आर. एन. देशपांडे, ए. एम. पाटील, पी. वाय. शिंदे आदी उपस्थित होते.