Tue, Apr 23, 2019 02:31होमपेज › Kolhapur › दहावीचा पहिला पेपर मराठीचाच

दहावीचा पहिला पेपर मराठीचाच

Published On: Feb 28 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 1:40AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरु होत आहे. पहिला पेपर मायबोली मराठीचा असणार आहे. सकाळी अकरा ते दोन या वेळेत पेपर असेल. कोल्हापूर विभागात 1 लाख 48 हजारहून अधिक विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.  

कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर विभागातून 354 केंद्रातून सुमारे 1 लाख 50 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. विभागासाठी19 भरारी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांमधील परीक्षेची बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे. 

अधिकृत वेळापत्रक पहावे

विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिकृत वेळापत्रक पहावे, सोशल मिडियावर आणि इतर ठिकाणी फिरणा-या वेळापत्रकांवर विश्वाकस ठेवू नये. अधिकृत वेळापत्रक शाळा आणि सबंधित केंद्रामध्ये पहायला मिळेल असे आवाहन विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी केले आहे. 

मित्रांनो, बेस्ट लक 

सोशल मिडियावर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लकचे संदेश दिले जात आहेत. भावांनो, आत्मविश्वांसाने परीक्षा द्या. गडबड, गोंधळ न करता शांतपणे प्रश्ने वाचून मग उत्तरे लिहण्यास सुरवात करा. अशा सुचनाही सोशल मिडियावरुन देण्यात आल्या आहेत.

परीक्षा बैठक व्यवस्था...

 • राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल-
 • एफ 092201 ते एफ 092570 (मराठी माध्यम)
 • एफ 092357 ते एफ 092567 (इंग्रजी माध्यम)
 • एफ 092491 ते एफ 092508 (उर्दू माध्यम)
 • होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल-
 • एफ 093458 ते एफ 093675 
 • एफ 093941 ते एफ 093968
 • छत्रपती राजाराम हायस्कूल-(मुख्य केंद्र)
 • एफ 093408 ते एफ 093457
 • एफ 093676 ते एफ 093940
 • आर्यर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल-
 • हरिहर हायस्कूल - एफ 097422 ते एफ 097521
 • आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल- एफ 097522 ते एफ 097856
 • श्री गुरुदेव विद्यानिकेतन, फुलेवाडी-
 • मनपा विद्यालय, फुलेवाडी - एफ 095601 ते एफ 095747 
 • श्री गुरुदेव विद्यानिकेतन - एफ 095265 ते एफ 095600
 • वि. स. खांडेकर प्रशाला-
 • विक्रम हायस्कूल, शिवाजी पार्क- एफ 098747 ते एफ 098926
 • वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी- एफ 098927 ते एफ 099205 (मराठी माध्यम)  एफ 099099 ते एफ 099196 (इंग्रजी माध्यम).