Mon, Apr 22, 2019 15:42होमपेज › Kolhapur › १०० कि.मी. चॅलेंज उपक्रम आज

१०० कि.मी. चॅलेंज उपक्रम आज

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:16AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

रग्गेडियन क्‍लब आयोजित ‘कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेची जय्यत तयारी म्हणून  100 किलोमीटर चॅलेंज हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 6 ते 15 जानेवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी 10 किलोमीटर पळणे असे उपक्रमाचे स्वरूप आहे. मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर दैनिक ‘पुढारी’ आहेत. 

शनिवारी (दि. 6) सकाळी साडेसहा वाजता, सेंट झेवियर्स हायस्कूल येथून उपक्रमास सुरुवात होईल. यामध्ये खेळाडूंना 10 दिवसांत 100 किलोमीटर अंतर पूर्ण करावयाचे आहे. याची पाहणी तज्ज्ञ मंडळी करणार असून ही रन पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना टी शर्ट व सर्टिफिकेट रग्गेडियनच्या वतीने दिले जाणार आहेत. फिटनेसचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. याच्या अधिक माहितीसाठी 9096620371 या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

हा उपक्रम सहभागी स्पर्धकांसाठी मोफत असणार आहे. उपक्रमाच्या ठिकाणी नावनोंदणी करून घेतली जाणार आहे. रविवारी दि. 7 जानेवारीस प्रॅक्टिस लाँग रन होणार असून सकाळी साडेसहा वाजता सेंट झेवियर्स हायस्कूल येथून सुरू होणार आहे. रनसाठी 5 ते 21 किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले असून, स्पर्धकांनी आपल्या इच्छेनुसार अंतर ठरवून ते पार करावयाचे आहे. स्पर्धकांनी यामध्ये आपल्या कुटुंबीयांसमवेत व मित्र परिवारासोबत सहभागी व्हावे, असे आवाहन रग्गेडियन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी  www.kolhapurrun.com/www.ruggedian.com या संकेतस्थळावर रग्गेडियन स्टोअर्स डीवायपी मॉल तिसरा मजला, डी.टी.कारेकर सराफ घाटी दरवाजा अंबाबाई मंदिर समोर, रग्गेडियन ऑफिस अमात्य टॉवर, चौथा मजला दाभोळकर कॉर्नर मॅरेथॉन संदर्भातातील अधिक माहितीसाठी 9623688883 किंवा 8806226600 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.