होमपेज › Kolhapur › कोल्हापूर रन मॅरेथॉन... 

कोल्हापूर रन मॅरेथॉन... 

Published On: Feb 11 2019 1:18AM | Last Updated: Feb 11 2019 1:18AM
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी

क्रीडानगरी कोल्हापुरात रविवारी दैनिक ‘पुढारी’ सहयोगी पार्टनर असणार्‍या ‘कोल्हापूर रन रग्गेडियन मॅरेथॉन 2019’ स्पर्धा अभूतपूर्व उत्साहात झाली. मॅरेथॉनमध्ये देशाच्या विविध राज्यांसह संपूर्ण महाराष्ट्रभरातून सुमारे 5 हजार आबालवृद्ध स्पर्धक सहभागी झाले होते. तब्बल सात तास मॅरेथॉनचा थरार कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींनी अनुभवला. मॅरेथॉनची विविधता दाखविणारी छायाचित्रे. 

संपूर्ण मॅरेथॉन मार्गावर असे चित्र दिसत होते. 

1) मॅरेथॉनमध्ये सहभागी अनेक खेळाडूंनी कर्तव्यभावनेतून ‘रन फॉर रोड सेफ्टी’सारखे सामाजिक संदेश दिले. 
2) मॅरेथॉनच्या 21 कि.मी. अंतराची स्पर्धा हृदय शस्त्रक्रिया झालेले युवक प्रशांत कुचरकर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

प्रमाणपत्र व मेडलसह सेल्फी घेताना तरुणी. 


 

मॅरेथॉनमध्ये हजारो आबालवृद्ध सहभागी झाल्याने संपूर्ण मार्गावर स्पर्धकांची अशी उत्साही आणि खचाखच गर्दी झाली होती. 

शिवकालीन युद्धकला पथकाने उपस्थितांची मने जिंकली.  

डी.जे.च्या तालावर खेळाडू असे थिरकले.

मॅरेथॉनमध्ये परदेशी स्पर्धकही सहभागी झाले होते.

दिव्यांग खेळाडूंनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.