Tue, Mar 19, 2019 09:14होमपेज › Kolhapur › रग्गेडियन मॅरेथॉनच्या धावमार्गाचा अभ्यास

रग्गेडियन मॅरेथॉनच्या धावमार्गाचा अभ्यास

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:16AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

क्रीडानगरी कोल्हापुरात 11 फेब्रुवारी रोजी होणार्‍या ‘हिट 24 ग्रुप प्रेझेंटस डीवायपी रग्गेडियन कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन 2018’ स्पर्धा अवघ्या दहा दिवसांवर आली आहे. यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हजारो धावपटूंच्या सहभागाच्या या स्पर्धेत आपापल्या गटात भरघोस यश मिळविण्यासाठी प्रत्येक खेळाडूची जय्यत तयारी सुरू आहे. दैनंदिन सरावाबरोबरच मॅरेथॉनच्या मार्गाचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. आपला वयोगट आणि त्यासाठी असणार्‍या मॅरेथॉनचे आंतर आणि त्यासाठीचा मार्ग यांचा समन्वय साधण्यात स्पर्धक गुंतले आहेत. 

दैनिक ‘पुढारी’ मॅरेथॉनचे असोसिएट पार्टनर असून हिट 24 ग्रुप प्रेझेंटिंग पार्टनर आहेत. डीवायपी गु्रप टायटल स्पॉन्सर व टोमॅटो एफ.एम. हे रेडिओ पार्टनर आहे. तसेच कॉसमॉस बँक गोल्ड स्पॉन्सर, फॉर्च्युन शहा गु्रप व एस.जी.यू. सिल्व्हर स्पॉन्सर,  जे. के. गु्रप व्हेंचर, कोरगावकर पेट्रोल पंप फ्युअल पार्टनर, कोंडुसकर ट्रॅव्हल्स पार्टनर, हॉटेल थ्री लिव्ह हॉस्पिटॅलिटी पार्टनर आणि हॉट फ्रायडे टॉक्स लाईफस्टाईल पार्टनर, इन्स्टिक्ट मीडिया डिजिटल पार्टनर आणि कोल्हापूर मनपाच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे.  

नोंदणी प्रक्रिया लवकरच बंद होणार

सुमारे 8 हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. लवकरच नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात येणार आहे. मॅरेथॉन सहभागासाठी  संकेत स्थळावरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी रग्गेडियन स्टोअर्स, डीवायपी मॉल तिसरा मजला, डी. टी. कारेकर सराफ (घाटी दरवाजा) अंबाबाई मंदिरसमोर, रग्गेडियन ऑफिस, अमात्य टॉवर, चौथा मजला, दाभोळकर कॉर्नर किंवा रग्गेडियन स्टोअर्स, डीवायपी मॉल, तिसरा मजला, कोल्हापूर आदी ठिकाणी सुरू असून याठिकाणी किंवा 9623688881, 8806226600/ 9623688886 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 स्पर्धा मार्गावर विविधतेची रेलचेल

स्पर्धा मार्गावर स्पर्धकांसह त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येणार्‍या क्रीडाप्रेमींसाठी विविधतेची रेलचेल पाहायला मिळणार आहे. सहभागी खेळाडूंना पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक, फळे यांची व्यवस्था असणार आहे. याशिवाय वातावरण निर्मितीसाठी लाईव्ह डी.जे., झांजपथक, भरतनाट्यम्, शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ), ढोलपथक, झुंबा, आतषबाजी अशा मनोरंजनाची विविधता असणार आहे. लोकांसाठी स्वच्छतागृहे, टॉयलेट्स यांचीही ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. 

 असा असेल मॅरेथॉनचा मार्ग

मॅरेथॉनची सुरुवात सेंट झेवियर्सपासून होईल. पोलिस मैदान चौक -धैर्यप्रसाद हॉल चौक - सर्किट हाऊस - लाईन बझारपासून पुन्हा फिरून सर्किट हाऊस - धैर्यप्रसाद चौक - ताराराणी चौक (कावळा नाका)- डीवायपी सीटी मॉल- उड्डाणपूल मार्गे- शिवाजी विद्यापीठ- शाहू नाकामार्गे पुन्हा परतीच्या मार्गावरून सेंट झेवियर्स (स्टार्टिंग पॉईंट) या मार्गावरून 50 कि.मी. 42 कि.मी. 21 कि.मी., 10 कि.मी. आणि 5 कि.मी. अंतराच्या स्पर्धा होणार आहेत. मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना आकर्षक मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येईल.