Thu, Jun 27, 2019 17:53होमपेज › Kolhapur › रस्ते विशेष दुरुस्तीसाठी जिल्ह्यास २० कोटी

रस्ते विशेष दुरुस्तीसाठी जिल्ह्यास २० कोटी

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 2:01AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सुनील सकटे

सा. बां. विभागातर्फे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रातील 29 कामांसाठी 198 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा कामांसाठी 20 कोटी 21 लाखांचा  निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून हा निधी उपलब्ध झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सहा कामांसाठी मंजूर निधीतून जिल्ह्यातील 61.637 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. कागल तालुक्यातील निढोरी, गोरंबे, कागल, सांगाव, यळगूड, रेंदाळ, रांगोळी, हेरवाड या 20 कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सात कोटी मंजूर आहेत.

येळाणे, कोपार्डे, शिंपे, सवते, सरुड, सागाव या साडेचार कि.मी. रस्ता दुरुस्तीसाठी दोन कोटी 80 लाख रुपये मंजूर आहेत. कोल्हापूर-परिते, गारगोटी, गडहिंग्लज, नेसरी, नागणवाडी, चंदगड मोटणवाडी, कळसगादे, भेंडशी या सहा कि.मी. रस्त्यासाठी तीन कोटी 20 लाख रुपये मंजूर आहेत. देवगड जिल्हा हद्द ते राधानगरी मुदाळतिट्टा, निढोरी, निपाणी या 8.80 कि.मी. रस्त्यासाठी तीन कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. आंबोली, आजरा, गडहिंग्लज, संकेश्‍वर या 15.437 कि.मी. रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. करवीर तालुक्यातील रा. मा. 189 ते चंद्रे, निगवे, कावणे, वडकशिवाले, इस्पुर्ली, दिंडनेर्ली, दर्‍याचे वडगाव, कोगील बु॥, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, नेर्ली, हालसवडे, पट्टणकोडोली या 6.90 कि.मी. रस्ता दुरुस्तीसाठी तीन कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.