Wed, Nov 14, 2018 14:20होमपेज › Kolhapur › विदर्भात उद्या राजर्षी शाहू पुतळा अनावरण

विदर्भात उद्या राजर्षी शाहू पुतळा अनावरण

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:33AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्याचा वारसा जपत लोकराजा राजर्षी शाहूंनी जनतेच्या कल्याणासाठी आणि तिला शिक्षणाने सक्षम करण्याचे कार्य आयुष्यभर केले. त्यांच्या या कार्याला मानाचा मुजरा म्हणून विदर्भात त्यांचा पहिला पुतळा उभारण्यात आला आहे. याचे अनावरण गुरुवार  (दि. 11 ) येथे दुपारी 1 वाजता होणार आहे.  विदर्भातील अकोट या गावातील राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात राजर्षी शाहूंचा हा पुतळा उभारण्यात आला आहे. संस्थेच्या सुवर्ण जयंती समारंभानिमित्त या पुतळ्याचे अनावरण खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे.  अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पोटे असणार आहेत. 

27 डिसेंबर 1917 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी विदर्भाचा (खामगाव) दौरा केला.  इतिहासातील या स्मृतींचे जतन-संवर्धन व्हावे, या उद्देशाने पुतळा उभारण्यात आला आहे. कलानगरी कोल्हापूरचे शिल्पकार किशोर पुरेकर यांनी हा पुतळा साकारला आहे. पुतळा अनावरण कार्यक्रमास शाहूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे.