Mon, Sep 24, 2018 09:22होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : राजाराम बंधाऱ्यावरुन अवजड वाहतुक बंद (Video)

कोल्हापूर : राजाराम बंधाऱ्यावरुन अवजड वाहतुक बंद (Video)

Published On: Jan 30 2018 8:12PM | Last Updated: Jan 30 2018 8:12PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरुन मिनीबस कोसळून झालेल्या अपघातानंतर पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुलावरुन होणारी वाहतुक त्यांनतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. यामध्ये बावड्यातील राजाराम बंधाऱ्याचाही समावेश आहे. मात्र गेले दोन दिवस राजाराम बंधाऱ्यावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक सुरक्षेच्या कारणावरुन आजपासून बंद करण्यात आली आहे. 

राजाराम बंधारादेखील जुना झाल्याने त्यावरुन अवजड वाहतुक धोकादायक बनली आहे. बंधारा अरुंद असल्याने त्यावरुन मोठी अवजड वाहने जाताना वाहतुक कोंडीही होते.  या कारणामुळे आज (मंगळवार ३० जानेवारी) दुपारपासून बंधाऱ्यावरुन अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे.