होमपेज › Kolhapur › कोल्हापूर रेल्वेस्थानक ‘अ’ श्रेणीत समावेश

कोल्हापूर रेल्वेस्थानक ‘अ’ श्रेणीत समावेश

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 12:35AMनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी जाहीर केला. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील 26 रेल्वे स्थानकांचा समावेश ‘अ’ श्रेणीत झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाने सातवा क्रमांक पटकावला. देशातील पहिल्या 10 स्थानकांमध्ये त्यांना स्थान मिळाले आहे. 

गुणांकनात सुधारणा झालेल्या रेल्वे स्थानकांच्या श्रेणीमध्ये मुंबईच्या सीएसटी स्थानकाने नवव्या, तर दादर रेल्वे स्थानकाने 11 व्या क्रमांकावर झेप घेतली  आहे. देशातील एकूण 332 रेल्वे स्थानकांची निवड ‘अ’ श्रेणीमध्ये करण्यात आली असून, महाराष्ट्रातील 26 रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. 

या श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, गोंदिया, मिरज, सांगली, लातूर, शिर्डी, चंद्रपूर, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगाव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.