Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Kolhapur › रेल्वे स्थानकात आता मोफत वायफाय सुविधा

रेल्वे स्थानकात आता मोफत वायफाय सुविधा

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर रेल्वेस्थानकात  मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली असून शनिवारी खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. केेद्र सरकारतर्फे ही प्रवाशांसह नागरीकांसाठी ही सुविधा पुरविण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीतर्फे पहिल्या टप्प्यात देशातील दोनशेहुन अधिक रेल्वेस्थानकात मोफत वायफाय सुविधा सुरु करण्यात आली आहे. तर दुसर्‍या टप्प्यात कोल्हापूर आणि मिरज या दोन्ही रेवल्वे स्थानकांत ही सुविधा सुरु करण्यात आली. तिसर्‍या टप्प्यात ग्रामीण भागातील रेल्वेस्थानकांत ही सेवा सुरु केली जाणार आहे. रेल्वेस्थाकात एकुण 16 अ‍ॅक्सेस पॉईट बसविण्यात आले आहेत. यापैकी पुरुष आणि महिला प्रतिक्षालय, व्हीआयपी रुम, तिकीट काउंटर, पीआरएस सेंटर या पाच अंतर्गत भागात तर 11 पॉईट रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसविण्यात आले आहेत. 30 एमबीपीएस या गतीने दर्जेदार इंटरनेट सेवा मिळणार आहे. ही सेवा मोफत मिळणार असून प्रत्येकास सहज सेवा उपलब्ध करुन घेता येणार असल्याचे तांत्रिक प्रतिनिधी राहुल माने यांनी सांगितले. 

या सेवेचा शुभारंभ खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना खा. महाडिक म्हणाले, केद्र सरकारने कोल्हापुरातील पाच सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सेवा द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीस पह्ल्यिा टप्प्यात यश मिळाले आहे. उर्वरीत सीबीएस, महालक्ष्मी मंदीर परिसर आणि दोन महा विद्यालयाचे परिसर या ठिकाणीही लवकरच अशी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. या सेवेमुळे पर्यटकांच्या दृष्टीने चांगली सोय झाली आहे.  यावेळी समीर शेठ, स्टेशन अधिक्षक विजय कुमार, शिवनाथ बियाणी मोहन शेटे, रेल्वे विभागाचे विद्युत अभियंता सुधीर देवधर, इम्तियाच शेख, रोहीत निर्वाणे आदी उपस्थित होत. रविवारी 21 जानेवारी रोजी रेल्वेचे सरव्यवस्थापक कोल्हापूरात भेट देणार आहेत. रेल्वेस्थानक सुशोभिकरणासाठी भगिरथी महिला संस्था आणि कोल्हापूर ग्रीन या संस्थांतर्फे रेल्वे स्थानकासाठी 300 रोपे प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाचा लूक बदलण्यास मदत होणार आहे असे महाडिक यांनी सांगितले.