Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Kolhapur › कूर नदीजवळच्या वळणावर खासगी ट्रॅव्हल्सला अपघात

कूर नदीजवळच्या वळणावर खासगी ट्रॅव्हल्सला अपघात

Published On: Jul 19 2018 11:09AM | Last Updated: Jul 20 2018 12:18AMगारगोटी : प्रतिनिधी

कूर-मडिगले बुद्रुक दरम्यान असलेल्या वेदगंगा नदीवरील धोकादायक पुलाजवळील वळणावर पुणेहून चंदगडकडे जाणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा पहाटे अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

इंदुमती या खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स पुण्याहून चंदगडकडे चालली होती. वेदगंगा नदीवरील कूर येथील स्मशानशेडजवळील धोकादायक वळणावर ट्रॅव्हल्स रस्ता सोडून नदीकडे झुकली. उजव्या बाजूला सखल भाग होता. ट्रॅव्हल्स पुढे  नदीच्या महापुराच्या पाण्यात गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याने काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल काढण्यात आली. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झालेली नाही.