Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Kolhapur › पेट्रोल पंप कामगारांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पेट्रोल पंप कामगारांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:47AM

बुकमार्क करा
कोल्हापूर  : प्रतिनिधी

पेट्रोल पंप कामगारांना किमान वेतन लागू असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. याच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (दि. 12) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती लाल बावटा पेट्रोल पंप कामगार संघटनेचे कॉ. भरमा कांबळे व कॉ. चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, देशात 56 हजार पेट्रोल पंप असून, यावर 9 लाख कामगार काम करतात. कोल्हापूर जिल्ह्यात 250 पेट्रोल पंप आहेत. यावर एक 1 हजाराहून अधिक कर्मचारी  आहेत. 2017 साली केंद्र सरकारने पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी किमान वेतन लागू करण्याबाबतचे आदेश दिले. हे वेतन त्यांच्या बँक खात्यांवर जमा करावे, असेही त्यांनी सांगितले.  या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने संघटनेने  आंदोलनाचा इशाराही दिला होता; पण कायदेशीर बाबींची कारणे सांगून  निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

10 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर काम करणार्‍या सर्व कामगारांनी किमान वेतनप्रमाणे पगार घ्यावा, तसे न झाल्यास 12 जानेवारीस पेट्रोप पंप बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता दसरा चोैकातून मोर्चाला प्रारंभ होणार असून, व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. या आंदोलनाला सांगली व सातारा येथील पेट्रोल पंप कामगारांनी पाठिंबा दिला असून, याची व्याप्ती अन्य जिल्ह्यांतही  वाढवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलेे.  पत्रकार परिषदेला मधुकर यवलुजे, राजू शेलार, संजय मुसळे व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.