Fri, Apr 26, 2019 09:37होमपेज › Kolhapur › लग्‍नाच्या बाराव्या दिवशी नवविवाहितेची आत्महत्या

लग्‍नाच्या बाराव्या दिवशी नवविवाहितेची आत्महत्या

Published On: May 07 2018 6:13PM | Last Updated: May 07 2018 6:13PMकोल्हापूर : प्रतिनिधी

लग्‍नाला अवघे बारा दिवस उलटले असताना नवविवाहितेने कळंबा येथील माहेरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शिवानी महेश सूर्यवंशी (वय 19, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा) असे तिचे नाव आहे. या घटनेने पतीसह नातेवाईकांना मानसिक धक्‍का बसला.

कळंब्यात राहणारे सतीश चौगले यांना तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. थोरली मुलगी शिवानीचा विवाह वसगडेतील महेश सूर्यवंशी यांच्याशी 25 एप्रिलला झाला. लग्‍नानंतर पाच दिवसांनी ती कळंबा येथे माहेरी आली होती.

रविवारी शिवानी आणि तिचे पती महेश सूर्यवंशी जोतिबा येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन करून घरी आल्यानंतर महेश वसगडे गावी निघून गेले. रविवारी सकाळी वडील सतीश चौगले मुलगा दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्याने तिकडे गेले. शिवानी आणि तिच्या बहिणी घरी होत्या. दरम्यान, दुपारनंतर शिवानी बराच वेळ दिसेनाशी झाल्याने बहिणींनी तिचा शोध घेतला. यावेळी शिवानीने बाथरूममध्ये साडीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती वडिलांना दिली. तसेच शिवानीला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. सीपीआरमध्ये चौगले यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.