Fri, Jul 19, 2019 19:50होमपेज › Kolhapur › रेडीरेकनर ‘जैसे थे’

रेडीरेकनर ‘जैसे थे’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्यात 2018-19 या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनर (बाजारमूल्य वार्षिक दर तक्‍ता) ‘जैसे थे’ ठेवण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर रेडीरेकनरमध्ये वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 2017-18 साली असलेलेच दर या वर्षासाठी लागू राहणार आहेत. यामुळे बांधकाम व्यवसायाला काहीसा दिलासा मिळाला आहे.गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम व्यवसायात मंदीचे वातावरण आहे. मंदी असतानाही गेल्या वर्षी रेडीरेकनरमध्ये सरासरी 5.86 टक्के वाढ झाली होती. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात सुमारे तीन टक्के दरवाढ करण्यात आली होती. यावर्षीही बांधकाम व्यवसायाला मंदीच्या झळा 

सोसाव्या लागत आहेत. रेडीरेकनरमध्ये वाढ झाल्यास अडचणीत आलेला बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यामुळे यावर्षी रेडीरेकनरमध्ये वाढ करू नये, अशी सार्वत्रिक मागणी होती.या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य शासनाने मुद्रांक विभागाला पत्राद्वारे आज कळवले. यानंतर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी यावर्षी रेडीरेकनरमध्ये वाढ न करता गेल्या वर्षीचे वार्षिक दर तक्‍ते, मूल्यांकन मार्गदर्शक सूचना आणि नवीन बांधकाम दर यावर्षीही कायम ठेवण्यात येत असल्याचे आदेश दिले. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Kolhapur Municipal Corporation, hike, nearly, three percent,  area


  •