Sun, Sep 23, 2018 06:46होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:39AMनवी दिल्ली : प्रतिनिधी

उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश होऊनही  अनेक दिवसांपासून कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा बंद आहे.  या संदर्भात खा. धनंजय महाडिक व खा.संभाजीराजे  यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्यामार्फत गुरुवारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी  विमानसेवेचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी केली.

कोल्हापूर-मुंबई एयर डेक्कनची आठवड्यातून तीन दिवसीय विमानसेवा गेल्या वर्षी 24 डिसेंबरला सुरू होणार होती. परंतु विमानसेवा देणार्‍या एयर डेक्कन विमान कंपनीच्या धोरणांमुळे ही विमानसेवा सुरू झाली नाही. जर ही विमान कंपनी सेवा देऊ शकत नसेल तर केंद्र शासनाने दुसर्‍या एअर लाईन्सला सेवा चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी  मागणी यावेळी  खा.  महाडिक व खा. संभाजीराजे  यांनी केली.