होमपेज › Kolhapur › अपघातानंतर स्थानिक धावले मदतीला (video)

अपघातानंतर स्थानिक धावले मदतीला (video)

Published On: Jan 27 2018 9:10AM | Last Updated: Jan 27 2018 1:46PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावरुन काल (शुक्रवारी) रात्री मिनी बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येत असताना बस नदीत कोसळली. 

वाचा : कोल्हापूरः शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगगा नदीत कोसळली, पुण्यातील १३ ठार

घटनास्थळी बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू करण्यात आले होते, २ तासानंतर व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या ट्रव्हल्समध्ये १७ जण होते यापैकी ८ जणांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते, तर ११ जणांना जलसमाधी मिळाली होती.  आज (शनिवार २७ जानेवारी) सकाळी सात वाजता एका बालकाचा मृतदेह मिळाला आहे. 

वाचा: कोल्हापूर: भीषण अपघातातील मृतांची नावे