होमपेज › Kolhapur › खंडपीठ मागणीसाठी प्रसाद जाधव धावणार

खंडपीठ मागणीसाठी प्रसाद जाधव धावणार

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीसाठी गेली 30 वर्षे वकिलांचे आंदोलन सुरू आहे.  कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार आणि वकील वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. याच मागणीसाठी कोल्हापूरचे प्रसाद जाधव हे मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. गतवर्षीही त्यांनी 42 किलोमीटर अंतर पूर्ण करत सर्किट बेंच मागणीकडे लक्ष वेधले होते. 
कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे, या मागणीच्या टॅगसह कोल्हापूर खंडपीठ पक्षकार व नागरी कृती समितीचे निमंत्रक प्रसाद जाधव धावणार आहेत.

गेली अनेक वर्षे ते या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन कोल्हापूरच्या प्रश्‍नांकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम सातत्याने करत आहेत. यापूर्वी त्यांनी टोलविरोधी टॅग लावून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी पुन्हा चौथ्यांदा महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. रविवारी (दि. 21) मॅरेथॉन होत आहे.  प्रसाद जाधव यांना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्याक्ष नारायण भांदिगरे अ‍ॅड. राजन कामत व अनेक विधिज्ञांनी शुभेच्छा देऊन मुंबईकडे रवाना केले.