Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Kolhapur › अवतरली शिवशाही

अवतरली शिवशाही

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 19 2018 10:51PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सर्व जाती-धर्मियांना एकत्र करून रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रीयत्वाचा व्यापक विचार पेरणार्‍या शिवछत्रपतींचा जयंती सोहळा सोमवारी सर्वत्र अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवत मुस्लिम धर्मीय बांधवांनीही शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला. शिवाजी पेठेचा पुरोगामी वारसा जपत शिवाजी तरुण मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने जयंतीचा उत्साह द्विगुणीत केला. 

 शिवाजी तरुण मंडळाची  भव्य मिरवणूक 

शिवाजी पेठेतील उभा मारुत चौक येथे दैनिक ‘पुढारी’चे  व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खा. धनंजय महाडिक, महापौर सौ. स्वाती यवलुजे, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर पोलीस अधिक्षक संजय मोहीते, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, अ‍ॅड. धनंजय पठाडे यांच्या प्रमुख  उपस्थितीत मिरवणूकीचे उद्घाटन करण्यात आले. हालगीचा कडकडाट, बँड पथकांची धूण, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, कार्यकर्त्यांंचा ओसंडून वाहणारा उत्साह रंगीबेरंगी फेटे परिधान केलेले कार्यकर्ते महिलांची प्रचंड गर्दी अशा उत्साही आणि जल्‍लोशी वातावरणात मिरवणुकीस सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी, राजमाता जिजाउ आणि मावळ्यांच्या वेशात सहभागी बालचमुंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवरायांनी रयतेसाठी दिलेले आदेशासह विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकणारे प्रबोधन फलक मिरवणूकीत आकर्षण ठरले. छत्रपती शिवरायांचा भव्य अश्‍वारुढ पुतळा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात घोड्यावर स्वार झालेले कार्यकर्ते, मावळ्यांच्या वेशात सहभागी झालेल्या कार्यकर्ते आणि एकावेळी तब्बल दहा ते पंधरा तुतारी वादक यांच्या सहभागाने मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. सायंकाळी सहा वाजता मिवरणुकीस सुरुवात झाली.

उभा मारुती चौक,  गांधी मैदान, अर्धा शिवाजीपुतळा, बिनखांबी गणेश मंदीर, महाव्दार रोड, पापाची तिकटी आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक, शिवाजी चौक, गुजरी, आदींसह विविध मार्गावरुन शिवाजी पेठेत मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. डॉल्बीसह संगमेश्‍वर येथील बँड पथकाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. मिरवणूकीत मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण अजित राउत, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सुरेश जरग, सदाभाउ शिर्के, अ‍ॅड. अशोकराव साळोखे, भिकशेट पाटील, चंद्रकांत साळोखे, केशवराव जाधव, अजित खराडे, मोशहन साळोखे, लालासाहेब गायकवाड, भानुदास इंगवले,  सुरेश गायकवाड, पंडितराव बोंद्रे,  विजय माने, चंद्रकांत जगदाळे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र चोपदार, राजेंद्र सरनाईक, श्रीकांत भोसले, चंद्रकांत सुर्यवंशी, विशाल बोंगाळे, अशोक देसाई, अक्षय मोरे, शाहीर दिलीप सावंत,  अभिषेक शिंंदे, सागर भालकर, अभिजित राउत यांच्यासह नागरीक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 जगात भारी 19 फेब्रुवारी....

‘जगात भारी 19 फेब्रुवारी, शिवजयंती घराघरात-मनामनात’ या उद्देशाने यंदाचा शिवजयंती सोहळा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र अभूतपुर्व उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजीपेठेचा पुरोगामी वारसा जपत शिवाजी तरुण मंडळातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे शिवजयंतीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपारिक पध्दतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीने जयंतीचा उत्साह द्विगुणीत केला. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीनेही प्रतिवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.

सकल मराठा समाज संघटना, श्रीमंत जिजाऊ फौडेशन, शिवशक्‍ती प्रतिष्ठान, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ यांच्यासह विविध संस्था-संघटना, तालीम संस्था, तरुण मंडळे आणि असंख्य शिवभक्त व इतिहासप्रेमींच्यावतीने शिवजयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला. शिवाजीपेठ, मंगळवारपेठेसह शहरातील विविध पेठासह छत्रपती शिवाजी चौक, मिरजकरतिकटी, बिंदू चौक, निवृत्तीचौक, उभा मारुती चौक, गंगावेश यासह चौकाचौकात आणि गल्ली बोळात शिवजयंती उत्साह दिवसभर दिसत होता. आकाशात भिरभिरणारे भगव ध्वज, पारंपारिक वाद्यांचा गजर, ऐतिहासिक वेशभूषा केलेले कार्यकर्ते, शिवकालीन युध्दकलांची प्रात्यक्षीके आणि शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 छत्रपती शिवाजी चौकात सर्वपक्षीय अभिवादन

शिवछत्रपती, राजमाता जिजाऊ व शहाजी महारांचा अखंड जयघोष करत शिवज्योत नेण्याची अबालवृध्दांची लगबग, भगवे ध्वज, पताका, पारंपारिक वाद्याचा गजर आणि  वछत्रपतींच्या कार्यकर्तुत्वाचे गोडवे गाणारे पोवाडे अशा वातावरणात सर्वत्र शिवछत्रपतींच्या जयंतीचा सोहळा सोमवारी झाला. पारंपारिक शिवजन्मकाळ सोहळा आणि मिरवणूका यासह शिवजयंतीनिमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

छत्रपती शिवाजी चौकात मुख्य सोहळा झाला. जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन व विविध राजकिय पक्ष-संस्था-संघटना यांच्यावतीने शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर सौ.स्वाती यवलूजे, खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पाळणा पूजन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्‍त डॉ.अभिजित चौधरी,  पोलिस निरीक्षक तानाजी सावंत,ईश्‍वर परमार, आदिल फरास, आर.के. पोवार, वसंतराव मुळीक, दिलीप पवार, रमेश पोवार, गणी आजरेकर, अनिल कदम, जयकुमार शिंदे,अशोक भंडारे, यांच्यासह शहाजीराजे तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शिवभक्त-इतिहासप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालशिवाजींचा पाळणा अनिता टिपुगडे, जहीदा मुजावर, सुनिता राऊत आदींनी म्हटला.   नर्सरी बागेतील शिवमंदीरात संस्थानची शिवजयंती  छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्यावतीने टाऊन हॉल परिसरातील नर्सरी बागेतील शिवछत्रपतींच्या मंदीरात शिवजयंतीचा पारंपारिक सोहळा झाला. जुना राजवाडा येथून शिवछत्रपतींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक लवाजम्यासह पालखी शिवमंदीरात आली. नव्या राजवाड्यातून हुजूर स्वार्‍या (छत्रपती घराण्यातील सदस्य) आले. सकाळी ठिक 10 वाजता, शिवजन्मकाळ सोहळा झाला.

चांदीच्या पालखीतील सोन्याच्या शिवछत्रपतींचे पूजन यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राजर्षी शाहू वैदीक स्कूलच्या पुरोहितांनी पूजन तर सौ. राधिका राघवेंद्र पंडितराव यांनी पाळणा गायला. यानंतर शाहीर कृष्णा जाधव व सहकार्‍यांनी पोवाडा सादर केला. यानंतर सरदार व मानकर्‍यांनी शिवछत्रपतींना अभिवादन केले. यावेळी ट्रस्टी अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांच्यासह छत्रपती शाहू विद्यालय, तारा कमांडो फोर्स, केएसएचे  पदाधिकारी आदींसह परिसरातील तालीम संस्था-तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपारिक वाद्यासह ढोलताशांच्या गजराने परिसर दणाणून गेला.


प्रबोधन फलकातून समस्यावर प्रकाशझोत 

मिरवणूकीत बैलगाड्यांवर प्रबोधन फलक लावण्यात आले होते. पंचगंगा नदीवर झालेल्या अपघात चौकातील मुलांनी केलल्या मदतीपासून तीन जानेवारी रोजी कोल्हापुरात झालेल्या दंगलीवर भाष्य करण्यात आले. मराठा आरक्षणावर भाष्य करण्यात आले. लाखोंच्या संयेख्येने अथांग सागराप्रमाणे आरक्षण मागणीसाठी आम्ही रस्त्यावर आलो, साधा दगडही उचलला नाही, सहिष्णू आम्ही मराठे सुसंस्कृत आहोत,आमचा नका अंत पाहू आरक्षण आता लवकर द्या पाहू अशी मागणी केली आहे.  चौकातील कार्टी या मथळ्याखालीट चांगला संदेश दिला आहे.

यात म्हटले आहे, चौकात बसणार्‍या मुलांना हिणवू नका एखाद्यावर संकट येताच हीच मुले धावून येतात एवढेच नाही तर अपघातप्रसंगी रक्‍त द्यायला हीच मुले रांग लावतात. कोल्हापुरात रस्ते आहेत की बोळ, वाहतुकीचा रोजचाच बट्याबोळ, नको तिथ स्पीड ब्रेकर नियोजनशून्य कारभार सारा दोष  कुणाला देणार जनता मात्र बेजार असे भाष्य केले.  खंडपीठ, शहरातील वाढती गुन्हेगारी, रंकाळा प्रदूषण संध्यामठ दुरावस्था, आदी प्रश्‍नावर भाष्य केले आहे. सामाजिक प्रदूषण या मथळ्याखाली  भीमा कोरेगांव दंगलीनंतर कोल्हापुरात झालेल्या दंगलीवर भाष्य करुन कोल्हापुर ही पुरोगामी नगरी असे सामाजिक प्रदूषण सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. 

मुलींच्या ढोल-ताशा पथकाने जिंकली मने

चित्तथरारक खेळ आणि लक्षवेधी गर्जना करत मुलींच्या ढोल-ताशा पथकाने शहरवासियांची मने जिंकली. श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती निमित्त सायंकाळी शिवाजी चौकातून पारंपरिक पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला-मुलींचा मोठा सहभाग होता.  मिरवणुकीचे उद्घाटन माजी महापौर हसिना फरास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षा साक्षी पन्हाळकर, कविता कोंडेकर आदी प्रमुख मान्यवर  उपस्थित होते.  

सायंकाळी शिवाजी चौकातून मिरवणुकीस सुरवात झाली. यावेळी भगवे झेंडे, कोल्हापूरी फेटे आणि पारंपरिक वेशभूषेतील पस्तीस मुलींचा सहभाग असलेल्या झांजपथकात लक्षवेधी कसरती करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत बिंदू चौक, महाव्दार रोड अशी मिरवणुक काढण्यात आली.  छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचा पुतळा मिरवणुकीत होता. यावेळी घोड्यावर बसलेले बाल शिवाजी व मावळ्यांच्या वेषभूषेतील कार्यकर्त्यांनीही उपस्थितांचे लक्ष वेधले.