Sun, Aug 18, 2019 20:47होमपेज › Kolhapur › सीपीआर बोगस प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी समिती

सीपीआर बोगस प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी समिती

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 1:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सीपीआरचे कर्मचारी ‘अपंग’ या मथळ्या खाली दैनिक ‘पुढारी’मध्ये 23 जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेत प्रशासनाने बोगस प्रमाणपत्रे देणार्‍या व घेणार्‍याचा शोध सुरू केला आहे. यामुळे रुग्णालय हादरले असून ज्यांचे हात यामध्ये बरबटलेले आहेत. ते अक्षरश:बिथरले आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सीपीआर प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.
विविध कारणांनी सीपीआर नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षभरापासून दर्जेदार सोयी सुविधांमुळे रुग्णालय चर्चेत आले असतानाच आता बोगस प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सीपीआरच्या काही कर्मचार्‍यांनी शासनाला गंडा घातला आहे. अपंगांची बोगस प्रमाणपत्रे देण्यात येथील आजी-माजी डॉक्टरांचा हात आहे.

कुंपन शेत खाऊ लागल्याने अपंग बांधव हातबल झाले आहेत. बोगस प्रमाणपत्राद्वारे अपंगाच्या टाळूवरचे लोणी अनेकांनी खाल्याची जोरदार चर्चा रुग्णालय परिसरात आहे. सीपीआरमधील बोगस प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सीपीआरचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घातले असून येत्या काही दिवसांत या टोळीत सक्रिय असणार्‍यांची नावे पुढे येतील.खरोखरचं अपंग असणार्‍या बांधवांना प्रमाणपत्रे मिळविताना सीपीआरमध्ये  तारेवरची कसरत करावी लागते. प्रमाणत्र आणि वैद्यकीय अहवालासाठी येथील कर्मचार्‍यांना ‘खुशी’ दिल्याशिवाय काम होत नसल्याची चर्चा अपंग बांधवांच्यात आहे.

आरोग्य सेवा संचालनालयाने अपंग प्रमाणपत्रांची तपासणी करून नवीन प्रणालीनुसार नूतनीकरण करण्याचा अध्यादेश काढला आहे. एसएडीएम प्रणालीमार्फत प्रक्रिया सुरू आहे. अनेक अपंगांनी संगणकीय नोंदणी केलेली नाही. काही ‘शंकास्पद’ अपंग बांधवांनी या नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये सीपीआरमधील आरोग्याने सुद‍ृढ पण कागदोपत्री अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळविलेल्यांचाही समावेश आहे.

गतीने चौकशी 

करू : डॉ. मिरगुंडे  सीपीआर रुग्णालयातील सर्वच अपंग प्रमाणपत्रांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची चौकशी समिती नेमण्यात आली असून गतीने तपास करून चौकशी केली जाईल. यामध्ये कोणतीही कसुर ठेवली जाणार नाही.लवकरच या टोळीचा पर्दाफाश चौकशी समिती करेल.अशी माहिती सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांनी दिली.