होमपेज › Kolhapur › अटल संध्या तील कलाकारांच्या अदाकारीस उपस्थितांची दाद

अटल संध्या तील कलाकारांच्या अदाकारीस उपस्थितांची दाद

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:56AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महानगर आणि मोबाईल ग्रुप फौंडेशनतर्फे आयोजित  ‘अटल संध्या’  या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध मराठमोळ्या गीतांसह कलाकारांनी सादर केलेल्या अदाकारीने उपस्थितांना खिळवून ठेवले. प्रत्येक गीतास उपस्थितांची चांगलीच दाद दिली. रंकाळा पदपथ उद्यान येथे शनिवारी सायंकाळी ‘मराठी पाऊल पडती पुढे’ हा गीत संगीताचा कार्यक्रम झाला.  

उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. अमल महाडिक यांनी रंकाळा सुशोभिकरणास आठ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, तर गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात झालेल्या घटना निंदनीय आहेत. यासंदर्भात चिंतन करण्याची गरज आहे. राजकीय कार्यक्रमांसह आता सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबविण्याची गरजेचे आहे. कोल्हापूरची संस्कृती आणि राजर्षी शाहू महाराज यांचे विचार जपण्याचे आवाहन आ. महाडिक यांनी केले. प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलनाबरोबरच  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले. 
कार्यक्रमास खा. धनंजय महाडिक यांच्यासह महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, अशोक देसाई, अमोल पालोजी,  किरण शिराळे, नगरसेवक,नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हेमंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले.