Wed, Jul 17, 2019 10:26होमपेज › Kolhapur › अप्पर पोलिस महासंचालकांनी घेतला कामकाजाचा आढावा

अप्पर पोलिस महासंचालकांनी घेतला कामकाजाचा आढावा

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी  

अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन) डी. कनकरत्नम यांनी शनिवारी पोलिस मुख्यालयांतर्गत विविध शाखांतील कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. मुख्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलीत व्यायामशाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वार्षिक निरीक्षणासाठी व्ही.कनकरत्नम येथे दाखल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी निरीक्षणाचा समारोप झाला. अप्पर पोलिस महासंचालकांनी पोलिस मुख्यालयांतर्गत दहशतवाद विरोधी, आर्थिक गुन्हे अन्वेषण, पोलिस कल्याण, महिला अत्याचार निवारण, स्थानिक गुन्हे अन्वेषण, सुरक्षा शाखा, पासपोर्ट आदी शाखांना भेटी देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

पोलिस कँटिनजवळ पोलिस कल्याण योजनेंतर्गत सुमारे 22 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटनही डी. कनकरत्नम यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वार्षिक निरीक्षणानंतर अप्पर पोलिस महासंचालकांनी समाधान व्यक्त करून पोलिस अधीक्षक संजय मोहिते व त्यांच्या टीमचे कौतुक केले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, डॉ. प्रशांत अमृतकर, आर.आर. पाटील, सुरज गुरव, कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, जिल्हा विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे आदी उपस्थित होते.