Wed, Aug 21, 2019 03:05होमपेज › Kolhapur › बारावीची उद्यापासून परीक्षा

बारावीची उद्यापासून परीक्षा

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) बुधवार (दि. 21) पासून सुरू होत आहे. पहिला पेपर सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा आहे.  विद्यार्थी आणि पालकांकडून कोणत्या महाविद्यायांत बैठक व्यवस्था आहे याची आज दिवसभर माहिती घेतली जात होती. यंदा कोल्हापूर विभागातून  जवळपास एक लाख 29 हजार 939 परीक्षार्थी आहेत. कोल्हापूर विभागातील 154 केंद्रांवर परीक्षा होणार असून यासाठी बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले. परीक्षा 20 मार्चपर्यंत असणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सूचना 

परीक्षार्थींनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे. दुपारी असणार्‍या पेपरबाबतही अर्धा तास अगोदर यावे, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. 

कॉपीमुक्‍त अभियानाला सहकार्य करा

कॉपीमुक्‍त अभियानासाठी परीक्षा मंडळाने कोल्हापूर विभागाने एकूण एकोणीस भरारी पथके नेमली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सात आणि सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी सहा भरारी पथके परीक्षा काळात कार्यरत असतील.  परीक्षा केंद्रांवर शांततेत प्रवेश करण्याच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आल्या असून, कॉपीमुक्‍त अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

बैठक व्यवस्थेबाबत आवाहन

बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहेच. शिवाय, प्रत्येक विषयानुसार केंद्र कार्यरत आहेत. संबंधित केंद्र प्रमुखांशी  संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महावीर कॉलेज केंद्र क्र. 424 हे वाणिज्य शाखेसाठी मुख्य केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी केंद्र संचालक संदीप नलवडे यांच्याशी संपर्क साधावा. विवेकानंद कॉलेज केंद्र क्रमांक 0423 कला शाखेसाठी असून केंद्रप्रमुख एम. ए. कुरणे यांच्याशी संपर्क साधावा.  राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज शास्त्र शाखेसाठी आणि एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) अभ्यासक्रमांसाठी असणार आहे. केंद्रप्रमुख आर. वाय. पाटील यांच्याशी   विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.