Wed, Apr 24, 2019 11:53होमपेज › Kolhapur › आणखी २८ जणांना अटक

आणखी २८ जणांना अटक

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:21AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

बंददरम्यान झालेल्या दगडफेक, तोडफोडप्रकरणी शनिवारी शहरातील 28 जणांना अटक करण्यात आली. अटकसत्र सुरूच आहे. अटकेची संख्या 104 वर पोहोचली आहे.  राजारामपुरी पोलिसांनी सागर बाबासाहेब शिंदे (वय 26), सोमनाथ भिकाजी चाटले (18, रा. भारतनगर), नाना उत्तम ओहाळ (30), नामदेव सीताराम नागटिळे (30), प्रकाश मारुती काकडे (28), गणेश तुकाराम भोसले (27), धारासिंग बाबुसिंग राजपूत (40), विजय लाला नागटिळे (20), दत्ता अंकुश लांडगे (32), बाळासाहेब बापू शिवशरण (32), हणमंत सीताराम नागटिळे (40), सौदागर बाबू कांबळे (48, सर्व रा. राजेंद्रनगर), किरण

स्वामी वैदू (25, साळोखे पार्क), आकाश दिलीप नागटिळे (22, भारतनगर) यांना अटक केली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी विकास बापू सोहनी (37), भीमराज कौतुक घोरपडे (30), अक्षय रजनीकांत कांबळे (30, सिद्धार्थनगर), सागर देवाप्पा कांबळे (23 राजेबागस्वार दर्गा), सादिक सलीम इनामदार (21), तानजी पोपट गोंधळी (30, दोघे रा. गडमुडशिंगी), शाहूपुरी पोलिसांनी संजय बळीराम कांबळे (48, पिंजार गल्ली, कसबा बावडा), राहुल दामोदर ढोबळे (32, रा. गोकुळ शिरगाव), विश्‍वास रामचंद्र तरटे (39, तामगाव, करवीर), राजवर्धन उद्धव आचार्य (24, रा. हालसवडे, करवीर) यांना अटक केली. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिसांनी रात्री आणखी तिघांना अटक केली.