Thu, Apr 25, 2019 05:36होमपेज › Kolhapur › कर्जमाफीचे १३ कोटी जमा

कर्जमाफीचे १३ कोटी जमा

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:59AM

बुकमार्क करा

कोल्हापूर :प्रतिनिधी

राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीअंतर्गत बुधवारी तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत जिल्ह्यातील 7 हजार 852 शेतकर्‍यांचा समावेश आहे. यातील 7 हजार 500 शेतकर्‍यांना 12 कोटी 50 लाख प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. तर 350 थकबाकीदारांना 1 कोटी 50 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाभार्थ्यांच्या खात्यांवर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिली. उर्वरित कर्जमाफीची यादीही अंतिम झाली असून, पुढील चार दिवसांत सर्वच खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.