Wed, Jul 24, 2019 14:40होमपेज › Kolhapur › घुणकीजवळ अपघात; बँक कर्मचारी ठार

घुणकीजवळ अपघात; बँक कर्मचारी ठार

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 2:11AMकिणी/ कोल्हापूर : प्रतिनिधी

घुणकीनजीक अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत मदन दत्ताजीराव भोसले (वय 46, रा. त्यागी कॉलनी, संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. मदन भोसले राजर्षी शाहू  गव्हर्न्मेंट सर्व्हंट बँकेत क्लार्क म्हणून नोकरीस होते. कराडजवळील पाली येथे खंडोबाच्या दर्शनाला तसेच बँकेच्या कामानिमित्त शनिवारी सकाळी ते बाहेर पडले. वारणा नदी पुलापासून काही अंतरावर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने ठोकरले. खांद्याला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. सीपीआर आवारात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.