होमपेज › Kolhapur › खाडेच्या पोलिस कोठडीत वाढ

खाडेच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:02AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणात पोलिस अटकेत असलेल्या चौघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता निखिल ऊर्फ भाऊ खाडे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी, तर भुजिंगा कांबळे, शशिकांत साळुखे, स्वाती माने यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

दरम्यान, शुक्रवारी रात्री तपास अधिकार्‍यांनी खाडेच्या घराची झडती घेतली. यामध्ये मोबाईलचे पाच सिमकार्ड व गुन्ह्यात वापरण्यात आलेला संशयित मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. याचबरोबर गुह्यातील 15 हजार रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. खाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाल्यानंतर पुन्हा शिरोळ व कोल्हापूर येथे आणि शुक्रवारी सांगली येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा पाटील (रा. चांदोली वडगाव) या महिलेची 75 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची सांगली पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.