Wed, Jan 23, 2019 10:46होमपेज › Kolhapur › सावधान! गायराने जाताहेत चोरीला

सावधान! गायराने जाताहेत चोरीला

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:06PM

बुकमार्क करा

कौलव : राजेंद्र दा. पाटील

पूर्वीपासून गावोगावी जनावरांचा चारा व पर्यावरण संतुलनासाठी राखीव ठेवलेल्या गायरानांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. त्यामुळे गावांची संपत्ती व ग्रामीण कृषी संस्कृतीचे  अविभाज्य अंग असलेली गायराने नामशेष होत असून, अतिक्रमणांमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनींवर डल्ला मारला जात आहे.

ग्रामीण भागात अगदी प्राचीन काळापासून गावोगावी गायरानांची व्यवस्था केलेली आहे. गावातील पशुधनाला मुबलक चारा मिळावा व पर्यावरण संतुलन राहावे, यासाठी गायरानाची व्यवस्था केली होती.गावाबाहेर विस्तीर्ण गायरान असायचे.गायरान हे गावातील गायी, बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी व त्यांच्या चार्‍यासाठी राखीव असायचे.गायरानात चार्‍यासह वेगवेगळ्या वनस्पतींची झुडपे होती. त्यात काही औषधी वनस्पती होत्या. चारा व झाडपाला यामुळे जनावरांना सकस व पौष्टिक चारा मिळत होता. दिवसभर गायरान गुरेढोरे व मानवी वावराने गजबजून जात होती.