Wed, Jun 26, 2019 11:23होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्‍लबतर्फे आज रंगणार ‘उत्सव नात्यांचा’

कस्तुरी क्‍लबतर्फे आज रंगणार ‘उत्सव नात्यांचा’

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:52AMकोल्हापूर :

‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे’ असा हा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा श्रावण महिना. यामध्ये पाना-फुलांनी वृक्ष बहरलेले असतात. याच श्रावण महिन्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लब आणि झी मराठी यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘उत्सव नात्यांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

हा कार्यक्रम आज, बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5.00 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. 

या कार्यक्रमामध्ये झी मराठी फेम तन्वी पालव, प्रल्हाद कुडतरकर यांच्या खुमासदार सूत्रसंचलनासोबत ‘बाजी’ या मालिकेतील बाजीफेम - अभिजित श्‍वेेतचंद्र आणि हिराफेम - नुपूर दैठणकर तसेच  तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणाफेम-हार्दिक जोशी, अंजलीफेम - अक्षया देवधर यांच्याशी दिलखुलास गप्पा. सोबत गायक चैतन्य कुलकर्णी, रसिका गानू, आरोही म्हात्रे, प्रसेन्‍नजीत कोसंबी यांच्या सुमधूर गीतांची मैफल रंगणार आहे. त्यांच्या सोबतीला अमोल पालेकर आणि वाद्यवृंद यांची साथसंगत असणार आहे. याशिवाय मधुरा गोंधळेकर आणि मृण्मयी गोंधळे यांचा बहारदार नृत्याविष्कार अनुभवास मिळणार आहे.

कस्तुरी क्‍लब सभासद आणि तिच्या मैत्रिणींना प्रवेश विनामूल्य आहे. 
कार्यक्रमाच्या पासेससाठी टोमॅटो एफ.एम. ऑफिस, वसंत प्लाझा, बागल चौक, कोल्हापूर  येथेे संपर्क साधावा.

कार्यक्रमस्थळी सभासद नोंदणी सुरू राहील : 
दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबची नवीन सभासद नोंदणी सुरू झाली असून, 600 रुपये सभासद नोंदणी फी आहे. यामध्ये लगेचच 550  रुपयांचा प्रेशर कुकर आणि अग्रवाल गोल्ड यांच्याकडून 999 रु. च्या गोल्ड प्लेटेड बांगड्या हमखास गिफ्ट म्हणून मिळते. याचबरोबर माईज रेस्टो-नाष्ट्याचा एक पदार्थ, चिंटूज रेसोई - व्हेज किंवा नॉनवेज बुफे, हॉटेल अभिनंदन - एक थाळी, क्रिमस्टोन आईस्क्रीम - 120 रुपयांचे आईस्क्रीम, फ्यूजन कॅफे- कॅफेमधील एक पदार्थ, रामचंद्र तवनाप्पा मूग - मसाला चटणी पाऊच, खातू मसाले - मसाले पाऊच, क्रिष्णाई उद्योग- कोकनट ऑईल बॉटल, असे मोफत कुपन्स मिळणार आहेत. याशिवाय असे बरेच डिस्काऊंट कुपन्ससुद्धा मिळणार आहेत. तरी आजच सभासद व्हा.

 कार्यक्रमस्थळी सभासद नोंदणी 
दुपारी 3 वाजता सुरू होईल. 
संपर्क ः- 0231-6628943, 8805007724, 8805007461