Thu, Jun 27, 2019 00:08होमपेज › Kolhapur › ‘कस्तुरी क्‍लब’संगे चला राऊतवाडीला

‘कस्तुरी क्‍लब’संगे चला राऊतवाडीला

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 11:15PMकोल्हापूर : 

पावसाळा सुरू झाला की, अवघी सृष्टी जलधारांनी न्हाऊन निघते. नद्या दुथडी भरून वाहू लागतात. धरणी जणू हिरवा शालू पांघरल्यासारखी दिसते आणि उंच डोंगरकपार्‍यांतून कोसळणारे धबधबे शुभ्र दुधाप्रमाणे भासतात. म्हणूनच असा हा विलोभनीय नजारा नजरेत टिपण्यासाठी आणि शहरातील इमारतींच्या जंगलातून दूर जाऊन धबधब्यांचे तुषार झेलण्यासाठी निसर्गाच्या जवळ जाण्याची इच्छा होते. हाच आनंद मनापासून उपभोगता यावा, यासाठी दै. पुढारी ‘कस्तुरी क्‍लब’ने खास महिलावर्गासाठी  वर्षा सहल आयोजित केली आहे. पर्यटकांना आकर्षित करणारा आणि 150 फुटांवरून कोसळणारा राऊतवाडीचा धबधबा हे या सहलीचे खास आकर्षण आहे. ‘कस्तुरी क्‍लब’तर्फे या एकदिवसीय वर्षा सहलीचे आयोजन बुधवार, दि. 18 जुलै रोजी करण्यात आले आहे. 

या सहलीसाठी ‘कस्तुरी क्‍लब’ सभासदांना प्रत्येकी फक्‍त रु. 550 व जे सभासद नाहीत त्यांनी प्रत्येकी 700 रु. शुल्क भरावयाचे आहे. सहलीचा प्रवास खर्च व सहलीदरम्यान सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा, बिस्कीट हे सर्व ‘कस्तुरी क्‍लब’मार्फत देण्यात येणार आहे.  हिरव्यागार निसर्गाच्या सान्‍निध्यात राऊतवाडीच्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सभासदांनी ‘कस्तुरी क्‍लब’ आयोजित या सहलीमध्ये सहभागी व्हावे. 

सभासदांनी आपली नावे टोमॅटो एफ.एम. कस्तुरी विभाग, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी फोन नं.  ऑफिस  : 0231-6625943, मोबा. - 8805007724, 8805024242.