Fri, Jul 19, 2019 17:45होमपेज › Kolhapur › कस्तुरी क्‍लबतर्फे गाण्यांचा बहारदार कार्यक्रम

कस्तुरी क्‍लबतर्फे गाण्यांचा बहारदार कार्यक्रम

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 12:28AMकोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे सभासदांसाठी कार्यशाळा, शैक्षणिक उपक्रम राबवून महिलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते व सभासदांची करमणूक केली जाते. अनेक सिने, नाट्य कलाकारांना भेटण्याची, त्यांना प्रत्यक्ष बघण्याची संधी कस्तुरी क्‍लबमार्फत नेहमीच महिलांना मिळत असते. 

याहीवेळेस मराठी चित्रपट रणांगण यातील प्रमुख कलाकार सचिन पिळगावकर, स्वप्निल जोशी, प्रणाली घोगरे यांना भेटण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच यांच्याबरोबरच्या दिलखुलास गप्पा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत. याबरोबरच कोणार्क शर्मा यांच्या हिंदी/मराठी गाण्यांची सुरेल मैफल उपस्थितांना ऐकण्यास मिळणार आहे. तसेच कस्तुरी क्‍लबने गेले 8 दिवस सभासदांसाठी घेतलेल्या मोफत झुंबा डान्स वर्कशॉपमधील एक छोटीशी झलकही उपस्थितांना पाहण्यास मिळेल.

या कार्यक्रमाचे सहप्रायोजक श्री ट्रॅव्हल्स हे असून, गेली 47 वर्षे श्री ट्रॅव्हल्स आपल्या पर्यटकांना सहलीचा अविस्मरणीय आनंद देत आहेत. विमान प्रवास, उत्तम भोजन व्यवस्था, दर्जेदार हॉटेल्स, महिलांसाठी विशेष पॅकेज, पर्यटकांना सहल किट, अशा विविध वैशिष्ट्यांनी श्री ट्रॅव्हल्स उत्तम दर्जाची सेवा देत आहे. यांच्या पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली, नगर अशा विविध ठिकाणी शाखा आहेत.हा कार्यक्रम रविवार, दि. 29 एप्रिल 2018 रोजी दु. 3.30 वा. व्ही. टी. पाटील हॉल, कमला कॉलेज येथे होणार असून, या कार्यक्रमाचे पासेस टोमॅटो एफ.एम. कार्यालय येथे उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क :
टोमॅटो एफ.एम., वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक, कोल्हापूर.  फोन - 8805007724, 8805024242, ऑफिस- 0231- 6625943.

Tags : Kolhapur, Kasturi Club, organised,  fantastic, program, songs