होमपेज › Kolhapur › कारखान्यांसमोर गाळप उद्दिष्टांचा प्रश्‍न

कारखान्यांसमोर गाळप उद्दिष्टांचा प्रश्‍न

Published On: Dec 25 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 12:23AM

बुकमार्क करा

कसबा बीड : वार्ताहर

साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरळीत लागून, चिमण्या जोमाने पेटू लागल्या आहेत. शेतकर्‍यांनाही ऊस घालवणेसाठी लागलेल्या घाई गडबडीचा फायदा उठवत खुद्द कारखान्यांलगतच्या गावातच बाहेरच्या साखर कारखान्यांच्या ऊस टोळ्यांनी घुसखोरी करत, परस्परांच्या उसाची पळवापळवी सुरू केली आहे. त्यामुळे अपेक्षीत एकूण गाळप उद्दिष्टाचा प्रश्‍न साखर कारखान्याना पडला आहे.
साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण उसाचे क्षेत्र, कारखान्यांची एकूण गाळप क्षमता यातून अपेक्षीत गाळप उद्दिष्टे कारखाने आपल्या समोर ठेवतात.

पण नियोजित क्रम पाळीने तोडपी गुलाल पडायच्या वेळी येणार,  शेतात वाट होणार मगच तोडणी होणार, उत्पन्नात घट होणार, याबरोबरच आहे तो ऊस घालवून भात, भुईमूग व सूर्यफूल आदी रब्बी पिके घेता येईल, ही कारणे पुढे करत शेतकरी ऊस घालवण्याची घाई गडबड करत आहे. त्यामुळे तोड येईल, त्या कारखान्यांना ऊस पाठवत आहेत. परिणामी साखर कारखान्यांसमोर गाळप क्षमतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. साखर कारखाना लगतच्या गावातील उसाची पळवापळवी केली जात आहे. अपेक्षित उसदर देऊनही परस्परांचे ऊस इकडे तिकडे जाऊ लागल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम होऊन अपेक्षीत गाळप उद्दिष्टांचा प्रश्‍न गंभीर बनत आहे.