Sun, Aug 25, 2019 04:25होमपेज › Kolhapur › ... तर रस्त्यावर उतरावे लागेल : आ. पाटील

... तर रस्त्यावर उतरावे लागेल : आ. पाटील

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 1:32AMकसबा बावडा : प्रतिनिधी

गुंठेवारीप्रमाणेच केंद्र सरकारच्या फायनान्शिअल रिजोल्युलन अँड डिपॉझिट इन्शुरन्सच्या कायद्याविरोधात येत्या काळात रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले. लाईनबाजार येथे आयोजित मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. लाईन बाजार येथील नागरिक व महिलांच्या वतीने आ. सतेज पाटील व सौ. प्रतिमा पाटील आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते महापौर सौ. स्वाती यवलुजे व सागर यवलुजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्ष निरीक्षक सत्यजित देशमुख उपस्थित होते.

केंद्र सरकार बँकांमधील सर्वसामान्यांच्या ठेवी परस्पर वापरण्यासाठी कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे भविष्यात ठेवी ठेवणारे अडचणीत येतील. कायदा पास झाला तर ठेवी मिळणे अवघड होईल. इंधनदरवाढीच्या माध्यमातून सरकारकडून सर्वसामान्यांची लूट होत आहे. सत्तेतील भाजप सरकार समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम आहे. यापेक्षा सरकारणे विकास, रोजगार यावर बोलावे, असेही आ.  पाटील यांनी स्पष्ट केले. महापौर सौ. स्वाती यवलुजे, प्रा. रफिक शेख यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत विनय मोरे यांनी केले.