Sat, Mar 23, 2019 18:06होमपेज › Kolhapur › कसबा बावड्यात भरधाव मोटारीची वाहनांना धडक

कसबा बावड्यात भरधाव मोटारीची वाहनांना धडक

Published On: Feb 25 2018 1:37AM | Last Updated: Feb 25 2018 1:36AMकसबा बावडा : प्रतिनिधी

कसबा बावडा येथील मुख्य रस्त्यावर भरधाव मोटारीने वाहनांसह दोघाजणांना धडक दिली.  यानंतर पिंजार गल्लीसमोर गाडीचा पाठलाग  करत असताना त्यांना चुकविण्याच्या प्रयत्नात मोटार ट्रकला धडकली. यानंतर चालकाला जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी जमावाने गाडीची तोडफोड केली. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. शिवराज स्वरुपकुमार पाटील (रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली) हा   स्विफ्ट (एमएच 10 बीएम 1222) गाडीतून भरधाव कसबा बावडा मुख्य रस्त्यावरून रात्री 10.30च्या सुमारास निघाला होता.

वाटेत त्याच्या गाडीची ठोकर काहींना बसली. यानंतर दुचाकीवरुन काहींनी पाठलाग केला. पिंजार गल्लीजवळ गाडी एका ट्रकला धडकून थांबली. यावेळी जमावाने  चालकाला चोप देत गाडी फोडली. रात्री उशिरापर्यंत मुख्य मार्गावर पोलिस थांबून होते.