Wed, Jul 17, 2019 08:00होमपेज › Kolhapur › प्रादेशिक सेनेच्या निवृत्त सैनिकांना पेन्शन द्या

प्रादेशिक सेनेच्या निवृत्त सैनिकांना पेन्शन द्या

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:51PM

बुकमार्क करा

सेनापती कापशी : प्रतिनिधी

प्रादेशिक सेनेच्या जवानांनी देश सेवेसाठी आपले कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या सेवेचा विचार करता त्यांना  निवृत्ती नंतर पेन्शन मिळावी, याबाबतची मागणी प्रादेशिक सेनेच्या जवानांनी म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली  आहे. निवेदनात म्हटले आहे, प्रादेशिक सेनेने भारत - चीन, भारत - पाकिस्तान या युद्धात तर गोवा मुक्ती संग्राममध्ये भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. असे असताना प्रादेशिक सेनेच्या जवानांना पेन्शन व इतर कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. यासाठी माजी सैनिकांना पेन्शन मिळाली पाहिजे; पण 15 वर्षांची इनबॉडीमेंट सेवा शिथिल करावी. 

प्रादेशिक सेनेच्या जवानांची जितकी वर्षे ट्रेनिंग तितकीच वर्षे पेड सर्व्हिस धरावी, सीएसटी कॅन्टीन मिळाव्यात, जवानांना व त्यांच्या कुटुंबाला मेडिकल सेवा मिळावी, जवानांच्या विधवांना पेन्शन मिळावी, जवानांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा मिळावी, मागील फरकाची रक्कम एक रकमी मिळावी, सैनिक कल्याण ऑफिसकडून ओळखपत्र मिळावे, मुलीच्या लग्नासाठी अनुदान मिळावे, रेग्युलर आर्मीप्रमाणे सर्व सवलती मिळाव्यात, 60 वर्ष वयावरील माजी सैनिकांना मोफत एस.टी., रेल्वे पास मिळावा, टी. ए. च्या कायद्यात आवश्यकतेनुसार बदल करावा, आदी मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषणाला बसू. असा इशाराही माजी प्रादेशिक सेनेचे अध्यक्ष मारुती पाटील व उपाध्यक्ष भूपाल भोसले यांनी दिला आहे.