Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Kolhapur › चिकोत्रा खोर्‍यात आठ गावांसाठी पाणी योजना : आ. मुश्रीफ

चिकोत्रा खोर्‍यात आठ गावांसाठी पाणी योजना : आ. मुश्रीफ

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:24PM

बुकमार्क करा

सेनापती कापशी : प्रतिनिधी

कागल तालुक्यातील कोरडवाहू आणि डोंगर माथ्यावर बसलेल्या बोळवी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, हसुर खुर्द, हसूर बुद्रुक, हळदी, बेनिक्रे, बेलेवाडी मासा या आठ गावांसाठी वेदगंगा नदीवरून पाणी योजना सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामार्फत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर चिकोत्रा खोर्‍यातील आठ गावांतील शेतकर्‍यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

 या आठ गावांतील सुमारे दहा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही योजना ठिबक सिंचनद्वारे कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी बँक ऑफ बडोदाने कर्जपुरवठा करण्याचे हमीपत्र दिले आहे. या योजनेचा सर्व खर्च कारखाना करणार असून शेतकर्‍यांनी चांगला ऊस पिकवून कारखान्याला पाठवावा. इतकीच अपेक्षा  आहे.

यावेळी डॉ. अरुण देशमुख, व्ही. डी. कुलकर्णी, महादेव कोंडेकर, चंद्रकांत पाटील, बी. एम. पठाण, नितीन कासार,दिग्वीजय पाटील यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी युवराज पाटील, भैया माने, उपस्थित होते. स्वागत  नविद मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी केले.