Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Kolhapur › टोलनाक्यांचे अवशेष हटवा

टोलनाक्यांचे अवशेष हटवा

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 18 2017 11:56PM

बुकमार्क करा

कंदलगाव ः वार्ताहर

आर.के.नगर टोलनाक्याचे अवशेष हटवा, अशी मागणी कंदलगाव येथील समाजवेध दक्षता समितीने केली  आहे.  गेल्या तीन वर्षांपासून बेवारस स्थितीत असणारे टोलनाक्याचे अवशेष अपघातास कारण ठरत असून, बंद पडलेल्या टोलनाक्यावरील सर्वच अडथळे दूर करून नागरिकांना प्रवासासाठी रस्ता रिकामा करावा.  शेंडापार्क परिसरात विजेअभावी अंधाराचे साम्राज्य पसरत आहेे. या परिसरात किरकोळ अपघात घडत आहेत. तेथे लाईटची सोय करावी. 

कागल एम.आय.डी.सी. व गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी. व हायवेसाठी कोल्हापूर व परिसरातील कामगार अधिकारी विद्यार्थी व दूध वाहूतक  तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्याने या रस्त्यावर रात्रंदिवस वर्दळ सुरू  असते.  आर.के.नगर, कंदलगाव परिसरातील कामगार अजूनही सायकल व पायी प्रवास करीत असल्याने रात्री येताना या नाक्यावरील कठड्यांचा अडथळा ठरत असल्याने  हानगरपालिकेकडून असे अडथळे काढून घ्यावेत, अशी मागणी समाजवेध दक्षता समितीचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली  आहे.