Sun, Nov 18, 2018 14:03होमपेज › Kolhapur › सर्वपक्षीय बहुजन समाजातर्फे कुरूंदवाडमध्ये कँडल मार्च

सर्वपक्षीय बहुजन समाजातर्फे कुरूंदवाडमध्ये कँडल मार्च

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 1:24AMकुरूंदवाड :प्रतिनिधी

कुरूंदवाड येथे सर्वपक्षीय, बहुजन समाजाच्या वतीने काश्मीर, कठुआ येथे आठवर्षीय आसिफा या मुलीवर बलात्कार करून तिची करण्यात आलेली हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्‍नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर साथीदारांच्या मदतीने आमदाराने केलेला बलात्कार या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आले होते.

दरम्यान, शहरातील शिवतीर्थ पासून निघालेल्या कँडल मार्च रॅलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध सभेत रूपांतर झाले. येथील शिवतिर्थाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायंकाळी साडेसहा वाजता सर्वपक्षीय बहुजन समाजातील नागरिकांच्या उपस्थितीत कँडल मार्च रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत कुरूंदवाड शहरासह हेरवाड, तेरवाड, औरवाड, भैरेवाडीसह परिसरातील गावातील नागरिक उपस्थित होते.

शिवतीर्थपासून निघालेली कँडल मार्च रॅली दर्गा चौक, नगरपालिका चौक, वंदे मातरम् चौक, सन्मित्र चौकमार्गे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर निषेध सभेला सुरुवात झाली.  यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप  पाटील, नगराध्यक्ष जयराम पाटील, चंगेजखान पठाण, महिपती बाबर, उदय डांगे यांची भाषणे झाली.