Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Kolhapur › राधानगरीत शनिवारी काजवा महोत्सव

राधानगरीत शनिवारी काजवा महोत्सव

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:07AMराधानगरी/प्रतिनिधी

विविधतेने नटलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील विशेष नैसर्गिक वारसा लाभलेल्या राधानगरी अभयारण्यश्रत राधानगरी नेचर क्लबच्या वतीने काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधार्‍या रात्री प्रकाश सोडून सर्वांना मोहीत करणारा काजवा पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून जीवशास्त्राच्या अभ्यासका बरोबरच पर्यावरण प्रेमींसाठी पर्वणीच असणार आहे. काजवा महोत्सव 26 मे ला सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.

राधानगरी अभयारण्य आणि परिसरमधील घनदाट वनराई,प्राणी, पशु, पक्षी, प्रसन्न वातावरण पर्यावरण प्रेमींना नेहमीच भुरळ घालत आलं आहे. राधानगरी अभयारण्य क्षेत्रात प्लास्टिक निर्मुलन , देवराई स्वछता मोहीम, निसर्ग संवर्धन अशा पर्यावरणपुरक उपक्रमाबरोबरच निसर्ग पर्यतानातून निसर्गाबद्दल प्रेम, कृतज्ञता, निर्सगाबद्दलची आपली कर्तव्ये आणि अभयारण्य परिसरातील युवकांना रोजगार निर्मिती व स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता व पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण करणे ह्या हेतूने परिस्थतिकी विकास समितीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

प्राणी, पक्षी, निसर्ग, सह्याद्रीचे उंच डोंगर, बाराही महिने हिरवेगार असणार्‍या या जंगलामध्ये एक समृद्ध जैव विविधता आढळते तसेच असंख्य प्रजातींचे आश्रयस्थान ही आहे हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे. खरं तर मानवी जीवनात पर्यावरण आणि निसर्गाच अनन्य साधारण महत्व आहे.तेथील पशु, पक्षी, प्राणी यांच्या जीवनशैलीचा मानवाच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.काजवा महोत्सव हा त्याचाच एक प्रकार आहे.

निसर्गाची मुक्त उधळण आणि अविष्कार बघायचा असेल तर नक्कीच ह्या काजवा महोत्सवाला भेट द्यायला हवी. हा आपल्या आयुष्यातील आनंद देणारा काळ असेल. अत्यंत माफक दरामध्ये 399 रुपयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यामध्ये अल्पोपहार,शुद्ध शाकाहारी भोजन तसेच अभयारण्यातील रानमेवा व शुद्ध आणि नैसर्गिक मध मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.त्याचबरोबर महोत्सवातुन गरजु आणि निराधार मुलांना आर्थिक सहाय्य करुन सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे.तरी आपण सर्व कुटुंब मित्र परिवार सोबत नक्की भेट द्या, असे आवाहन अध्यक्ष फिरोज गोलंदाज उपाध्यक्ष शशांक लिंग्रस यांनी केले.