Fri, Apr 19, 2019 07:57होमपेज › Kolhapur › समरजितसिंह यशस्वी भव! : महाडिक

समरजितसिंह यशस्वी भव! : महाडिक

Published On: Feb 02 2018 4:30PM | Last Updated: Feb 02 2018 4:58PMकसबा सांगाव : वार्ताहर

स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांचा सामाजिक, राजकीय वारसा चालवताना किंबहुना त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे टाकत समरजितसिंह घाटगे  यांची कागल तालुक्यात घौडदौड सुरू आहे. त्यांना त्यात यश मिळो, यशस्वी भव ! अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या.

कागलच्या राजकारणात नवी समीकरणे?
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची केलेली घोषणा. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचेच खासदार धनंजय महाडिक यांनी ‘भाजप’चे युवा नेते, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना दिलेल्या शुभेच्छांनी कागलचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यामुळे आगामी काळात नवी समीकरणे जुळण्याचे संकेत मिळत आहेत. 

वाचा : विधानसभेसाठी कागलमध्ये जोर-बैठका

मौजे सांगाव (ता. कागल) येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार महाडिक यांनी समरजितसिंह घाटगे यांना शुभेच्छा दिल्या. म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यावेळी उपस्थित होते. समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'कागलच्या राजकीय विद्यापीठात अजूनही शोशत विकासातून करण्यासारख्या अनेक गोष्टी शिल्लक आहेत. सर्वांच्या सहकार्याने सकारात्मकतेने त्या पूर्णत्वास घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक शि. ना. पाटील हायस्कूलचे अध्यक्ष यशवंत
पाटील, सचिव रामसिंग पाटील, कसबा सांगावचे माजी उपसरपंच अजित शेटे, माजी ग्रा. पं. सदस्य गजानन माळकर, शाहूचे संचालक युवराज पाटील, बी. जी. पाटील, सतीश देसाई आदी उपस्थित होते.