Tue, Feb 19, 2019 10:16होमपेज › Kolhapur › कार्यालयाला अधिकारी अन् रस्त्याला निधी नाही

कार्यालयाला अधिकारी अन् रस्त्याला निधी नाही

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:00AM

बुकमार्क करा
कागल : प्रतिनिधी

रस्त्यासाठी शासनाचा निधी नाही आणि बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अधिकारी नाही. त्यामुळे कागल तालुक्यातील रस्त्यांची अवस्था सध्या खड्ड्यांकडून खड्ड्यांकडे अशी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले; मात्र जिल्हा परिषदेच्या रस्त्यांना कोणी वालीच उरला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील इतर जिल्हामार्ग देखभाल, दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने आपल्याकडे वर्ग करून घेण्याची गरज आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व जिल्हा आणि राज्यमार्गांवरील खड्डे शंभर टक्के भरण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची चर्चा सध्या तरी थांबली असली, तरी खड्डे भरून झाल्यानंतर सततच्या वाहतुकीमुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडू लागले आहेत. तर लहान खड्डे मोठे होऊ लागले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ठेकेदारही अनुत्सुक आहेत.