होमपेज › Kolhapur › लोकसभा निवडणूक नेटाने लढवू

लोकसभा निवडणूक नेटाने लढवू

Published On: Feb 28 2018 1:16AM | Last Updated: Feb 27 2018 11:50PMकागल : प्रतिनिधी

पैसे आणि पदे देऊन, विकत घेऊन राजकारण करणारे एकीकडे आणि सर्वसामान्य माणसांचा विश्‍वास संपादन करून समाजासाठी काम करणारी मंडळी दुसर्‍या बाजूला आहेत. याच मुद्द्यावर येणार्‍या निवडणुका होणार आहेत. संजय मंडलिक यांची येणारी लोकसभेची निवडणूक सर्वांनी नेटाने लढवू या, असे आवाहन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. येथे आयोजित चैतन्य युवा  मेळाव्यात ते बोलत होते. 

आ. आबीटकर म्हणाले, भविष्यात जिल्ह्याचे राजकारण आपल्याला करायचे आहे. अनेक प्रश्‍नांवर लढाई करायची आहे. त्यासाठी तरुणांनी कामाला लागावे. मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र मंडलिक म्हणाले, आक्रमक बोलण्यापेक्षा आक्रमक काम करून दाखवण्याची गरज आहे. भारती विद्यापीठाचे डॉ. जितेश कदम, अभिजित तायशेट्टी, शिवराज मोरे यांनी मनोगत व्यक्‍त केली.  प्रा. सुनील शिंत्रे, समरजित मंडलिक,  ईगल प्रभावळकर,  बाबगोंडा पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, धनराज घाटगे आदी उपस्थित होते. स्वागत महेश घाटगे यांनी केले. धोंडिराम परीट यांनी शिववंदन सादर केले.