Sat, Apr 20, 2019 16:38होमपेज › Kolhapur › केएमटीची आजपासून करवीर दर्शन सेवा

केएमटीची आजपासून करवीर दर्शन सेवा

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:16AM

बुकमार्क करा
तिकीट दर असे... 

प्रौढ -     175 रु.
लहान -     90 रु.

प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खर्च...

प्रौढ -     293 रु. 
लहान -     76 रु. 


कोल्हापूर : प्रतिनिधी

केएमटीच्या वतीने मंगळवारपासून करवीर दर्शन बससेवा सुरू करण्यात येणार आहे. महापौर हसिना फरास यांच्या हस्ते सकाळी साडेअकराला छत्रपती शिवाजी चौक येथे बससेवेचे उद्घाटन होईल, अशी माहिती परिवहन समिती सभापती नियाज खान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जोतिबा व पन्हाळा या ठिकाणी करवीर दर्शन बस जाण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) परवानगी मागितली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सभापती खान व नगरसेवक शेखर कुसाळे यांनी सांगितले की, शहरात येणारे भाविक व पर्यटकांना वेगवेगळ्या भागातील स्थळे एकत्रितपणे एकाचवेळी पाहण्यासाठी करवीर दर्शन ही विशेष बससेवा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी आकर्षक रंगसंगतीची बस तयार केली आहे. दसरा चौकातून रोज सकाळी दहाला बस सुटेल. सायंकाळी सहाला रंकाळा येथे पर्यटकांना सोडण्यात येईल. तेथून त्यांना करवीर दर्शनसाठी दिलेल्या पासवर केएमटीच्या कोणत्याही बसमधून एस.टी. स्टँड किंवा राहत्या ठिकाणी मोफत जाता येईल. प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी 5 तास 20 मिनिटांचा कालावधी निश्‍चित केला आहे. प्रौढास 175 व लहानास 90 रु. तिकीट दर आहे. तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी प्रौढास 293 व लहानास 76 रु. इतका अतिरिक्‍त खर्च पर्यटकांना त्यांच्या इच्छेनुसार करावा लागणार आहे. यावेळी संजय भोसले उपस्थित होते.

...या प्रेक्षणीय स्थळांचा समावेश

चिमासाहेब चौक, दसरा चौकातील श्री शाहूकालीन चार बोर्डिंग (दैवज्ञ बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग), टाऊन हॉल संग्रहालय, न्यू पॅलेस संग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थान, शिवाजी विद्यापीठ, कणेरी मठ सिद्धगिरी मठ म्युझियम, शाहू खासबाग कुस्ती मैदान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, गंगावेस दूधकट्टा, रंकाळा, श्री अंबाबाई मंदिर व भवानी मंडप, पोलिस उद्यानातील देशातील द्वितीय क्रमांकाचा 303 फूट उंच राष्ट्रध्वज.