होमपेज › Kolhapur › ज्यु वर्ल्डकप : एअर रायफल प्रकारात कोल्‍हापूरच्या शाहू मानेला सुवर्ण

ज्यु. वर्ल्डकप शूटिंग : कोल्‍हापूरच्या मानेला सुवर्ण 

Published On: Jun 26 2018 6:02PM | Last Updated: Jun 26 2018 7:29PMसुल (जर्मनी)

जर्मनी येथे सुरू असलेल्या ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज शाहू तुषार माने याने १० मीटर एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्ण पदक पटकावले आहे.शाहू माने, आसामचा ह्रदय हजारीका,व राजस्थानचा दिव्यांश पानवार या भारतीय संघाने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत भारताला सुवर्ण पदक मिळवुण दिले.

भारतीय संघाने दिमाखदार कामगीरी करताना सर्वाधिक १८७५.३ गुणांचा विश्व विक्रम प्रस्थापित करुन प्रथम स्थान मिळवुण सुवर्ण पदक प्राप्त केले तर, १८७३.४ गुण मिळवुण रशीयाने रौप्य व १८७०.८ गुणासह चीन संघाने कांस्य पदक मिळविले.

शाहू माने दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शुटींग रेंजवर सराव करित असुन त्याला भारतीय संघप्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेत्या व ऑलंपीकपटू नेमबाज दिपाली देशपांडे, सुमा शिरुर तसेच शिव छत्रपती क्रिडा पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय नेमबाज संदीप तरटे यांचे मार्गदर्शन लाभले,तसेच कोल्हापूर जिल्हा मेन वुमेन रायफल असोसिएशन व सेंट झेवीअर्सचे फादर जेम्स थोरात क्रिडा शिक्षक किरण साळोखे,अलताफ कुरेशी,मोहन लोहार यांचे सहकार्य लाभले.