Tue, Nov 13, 2018 08:03होमपेज › Kolhapur › वारणा पाणीप्रश्‍नी 22 लामंत्रालयात संयुक्‍त बैठक

वारणा पाणीप्रश्‍नी 22 लामंत्रालयात संयुक्‍त बैठक

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:47AMइचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा करण्याच्या ‘अमृत’ योजनेला विरोध होत असल्याने याबाबत मार्ग काढण्यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी विरोधी व कृती समितीची एकत्रित व्यापक बैठक येत्या मंगळवारी (दि. 22) दुपारी 12 वाजता मंत्रालयात बोलावली आहे.वारणा योजनेच्या समर्थनार्थ इचलकरंजीत 14 मे रोजी सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर चक्री उपोषण करण्यात आले. बुधवारी आमदार सुरेश हाळवणकर यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांची भेट घेतली. वारणा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा झाल्यास  शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीकाठावरील गावांत पाण्याची टंचाई भासेल, असा अपप्रचार करण्यात येत असल्यामुळे गैरसमजातून विरोध वाढत आहे. त्यामुळे योजनेला विरोध करणार्‍या वारणा योजना विरोधी समिती व इचलकरंजीतील वारणा योजना कृती समिती यांची एकत्रित बैठक आयोजित करून तोडगा काढावा, अशी विनंती मंत्री लोणीकर यांच्याकडे करण्यात आली.

बैठकीस पालकमंत्री पाटील, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आ. हाळवणकर, आ. उल्हास पाटील, वारणा विरोधी कृती समितीचे मार्गदर्शक एन. डी. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्षा सौ. सरिता आवळे, तानाजी पोवार, सुनील पाटील, विठ्ठल चोपडे, अजित जाधव, सागर चाळके, अशोक जांभळे, रवींद्र माने, शशांक बावचकर आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.