Wed, Nov 14, 2018 10:08होमपेज › Kolhapur › जिजाऊ जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

जिजाऊ जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:15AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवछत्रपतींनी रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. यासाठी त्यांना स्वराज्य संकल्पक-गुरू म्हणून राजमाता जिजाऊ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 12 जानेवारी हा जिजाऊंचा जन्मदिन. त्यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी इतिहासप्रेमी संस्था-संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मनपा व राजमाता तरुण मंडळातर्फे केएमसी कॉलेजच्या प्रांगणातील जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादनाचा कार्यक्रम होईल. दरम्यान, शिवशक्‍ती प्रतिष्ठानने जिजाऊ स्मारकाची स्वच्छता केली असून परिसर विद्युत रोषणाईने सजविला आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता स्मारक परिसरात दीपोत्सव करून जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे.  

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा शाखेतर्फे शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात शुक्रवारी सायंकाळी 5 वा. जिजाऊ जयंतीचा कार्यक्रम होईल. जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन सौ. संयोगिताराजे, मधुरिमाराजे छत्रपती आणि महापौर सौ. स्वाती यवलुजे यांच्या हस्ते होईल. यावेळी नगरसेविका शोभा बोंद्रे, मनीषा शिंदे-देसाई, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी अनिता जाधव या जिजाऊंच्या कार्याची माहिती देणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.