Mon, Jul 22, 2019 05:20होमपेज › Kolhapur › जयसिंगपुरात पावणेतीन लाखांची घरफोडी

जयसिंगपुरात पावणेतीन लाखांची घरफोडी

Published On: May 26 2018 6:00PM | Last Updated: May 26 2018 6:14PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपुरातील लक्ष्मी रोडवर असलेल्या बंद घराचा कडी कोयंडा उचकटून व घरातील तिजोरीचा दरवाजा कटावणीने उचकटून  चोरट्याने आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह वीस हजारांची रोकड असा सुमारे दोन लाख ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लक्ष्मी पार्कातील विकास कॉलनी  शिंदे काँलनी परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही चोरी करून चोरट्याने पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. 

संजय मारुती श्रीखंडे (वय ४९) हे कुटुंबासह चिपरी येथील नव्या घरात कार्यक्रमाच्या तयारीसाठी शुक्रवारी रात्री गेले होते. ही संधी साधून चोरट्याने कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्‍यांनी घरातुन २५ व ३० ग्रँम वजनाचे दोन गंठण,१५ ग्रँम वजनाची सोन्याची अंगठी ,१ तोळ्याची चेन तसेच तसेच चांदीचा तांब्या,ताट,पैंजण असा ऐवज लंपास केला. पहाटे सुमारे साडे पाच ते सहाच्या सुमारास संजय हे पत्नी, मुलगा व आईसह घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्‍याचे त्‍यांना समजले. श्रीखंडे यांचा खासगी घरगुती भोजनालयचा व्यवसाय आहे. जयसिंगपूरचे पोलिस अधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक सौ. पूनम माने या घटनेचा तपास करत आहेत.