Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Kolhapur › जयंती उत्सव मंडळे स्वत:च फलक काढणार

जयंती उत्सव मंडळे स्वत:च फलक काढणार

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 10:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्ताने शहरासह जिल्ह्यात लावण्यात आलेले डिजिटल फलक उत्सव संपताच स्वत:हून काढून घेण्याचे आश्‍वासन जयंती सोहळा उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी पोलिस अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले.  सामाजिक सलोखा, प्रबोधनाला प्राधान्य देत निर्धारित वेळेत मिरवणुका संपविण्याचे आवाहन पोलिस अधिकार्‍यांनी केले आहे.

शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आज, सकाळी पोलिस मुख्यालयात झाली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाटगे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमासह मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (मंगळवारी) आणि बुधवारी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले 
आहे.

या पार्श्‍वभूमीवर नियोजनचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिकारी आणि विविध मंडळांच्या पदाधिकार्‍यांची संयुक्‍त बैठक बोलाविण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले.शिवचरित्रातील देखाव्यासह सामाजिक सलोखा, प्रबोधनपर देखावे सादर करण्यात येणार असल्याचे शहरातील बहुतांशी शिवजयंती उत्सव मंडळांनी स्पष्ट केले.  मिरवणुकीतील गर्दी  टाळण्यासाठी जुना बुधवार पेठ मंडळाने बुधवारी मिरवणुकीचे आयोजन केल्याचे मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक काकडे, घाटगे, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, शशिराज पाटोळे, अनिल गुजर, मंडळांच्यावतीने बाबा पार्टे, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक दिगंबर फराकटे, हर्षल सुर्वे, नागेश भोसले सहभागी झाले होते.   

Tags : Kolhapur, Jayanti, Utsav, boards,  draw, own, boards