Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Kolhapur › हमीदवाड्यातील जवानाची नाशिक येथे आत्महत्या

हमीदवाड्यातील जवानाची नाशिक येथे आत्महत्या

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:58AMहमीदवाडा : प्रतिनिधी

येथील  जवान कृष्णात नागू कोल्हे (वय 33) यांनी नाशिक येथे आत्महत्या केली. आर्मी सप्लाय कोअरमध्ये 15 वर्षांपासून तेे लष्करी सेवेत होते. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

त्यांचे पोस्टिंग जोधपूर (राजस्थान) येथे होते. 5 जानेवारी रोजी ते लष्करी वाहन दुरुस्तीसाठी नाशिक येथील देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी सायंकाळी डेअरी फार्मसमोरील एमटी पार्क शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. लष्करी जवान व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.  सुभेदार गुरुतेज यांनी वर्दी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यामध्ये दिली, तसेच कुटुंबीयांना कळवण्यात आले. कुटुंबीय नातेवाईक हमीदवाडा येथून नाशिककडे रवाना झाले. शनिवारी सायंकाळी शव विच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. सोमवारी सकाळी त्यांच्यावर हमीदवाडा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांचा लहान भाऊ देखील सैन्यात कार्यरत आहे. 3 महिन्यांपूर्वी कृष्णात सुट्टीवर येऊन गेले होते. त्यांच्या या कृतीने गावातून हळहळ व्यक्त होत आहे.