Sat, Aug 24, 2019 23:24होमपेज › Kolhapur › गाळपासह साखर उत्पादनात ‘जवाहर’ प्रथम

गाळपासह साखर उत्पादनात ‘जवाहर’ प्रथम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

यवलूज : वार्ताहर

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्यातील 22 पैकी 14 साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. ऊस गाळपात जवाहर कारखान्याने 15 लाख 42 हजार 500 मे. टन गाळप करून 19 लाख 42 हजार 300 क्‍विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपात जवाहर कारखान्याने 15 लाख 42 हजार 500 मे. टन गाळप करून 19 लाख 42 हजार 300 क्‍विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या कारखान्याने गाळपात व साखर उत्पादनात अव्वल स्थान पटकावले आहे.

दत्त दालमिया कारखाना 13.16 टक्के साखर उतारा मिळवून प्रथम क्रमांकावर आहे. हा साखर उतारा राज्यात सर्वाधिक उतारा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15 सहकारी व 7 खासगी कारखान्याकडून 1 कोटी 30 लाख 33 हजार 587 मे. टन उसाचे गाळप आहे. 1 कोटी 62 लाख 88 हजार 041 क्‍विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 12.50 टक्के इतका आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मिळून कोल्हापूर विभागात 2 कोटी 60 हजार 73 मे. टनाचे गाळप झाले आहे. 2 कोटी 51 लाख 67 हजार 516 क्‍विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्याआहेत. तोडणी मजुरांच्या टंचाई भासत आहे. त्यामुळे उर्वरित ऊस गाळपास आणण्याचे मोठे आव्हान कारखान्यांसमोर उभे आहे. 22 मार्चअखेर झालेल्या गाळपात कोल्हापूर जिल्ह्यासह कोल्हापूर विभागात जवाहर कारखान्याने 15 लाख 42 हजार 500 मे. टनाचे गाळप करून 19 लाख 42 हजार 300 क्‍विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. गाळपात व साखर उत्पादनात या कारखान्याने अव्वल स्थान पटकावले आहे. साखर उतार्‍यात दत्त दालमियाने 13.16 टक्के उतारा मिळवून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम संपवला आहे. गाळपात सहकारी कारखाने पुढे आहेत, तर साखर उतार्‍यात खासगी कारखाने पुढे आहेत.

 

Tags : kolhapur, kolhapur news, sugar, sugar factory, Jawahar factory, production, first,


  •