Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Kolhapur › जयसिंगपूरचा हवालदार अनिल चव्हाण निलंबित 

जयसिंगपूरचा हवालदार अनिल चव्हाण निलंबित 

Published On: Mar 05 2018 9:07PM | Last Updated: Mar 05 2018 9:07PMजयसिंगपूर : प्रतिनिधी

बिल्डरकडून आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील संशयित हवालदार अनिल चव्हाण याला जिल्हा पोलिस प्रमुखांनी  निलंबित केले. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी याबाबत माहिती दिली. 

अनिल चव्हाण याच्यासह विकि आणि  वैभव खामकर या दोन भावांचा  या प्रकरणात समावेश आहे. तीनही संशयित फरारी आहेत. चव्हाण यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिल्याची माहिती पिंगळे यांनी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांच्याकडे तपास आहे.